भुसावळातील गायत्री पान सेंटरमधून 14 हजारांचा प्रतिबंधीत पानमसाला जप्त


14,000 banned Panmasala confiscated from Gayatri Pan Center in Bhusawal
भुसावळ :
शहरातील जळगाव रोडवरील टेक्नीकल हायस्कूलसमोरील सरदार वल्लभभाई पटेल कॉम्प्लेक्समधील पान सेंटरमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी छापा मारीत 14 हजारांचा राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखू, सुपारी, पानमसाल्याचा साठा जप्त केला. या कारवाईने शहरातील अवैधरीत्या गुटखा विक्री करणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, शहरात खुलेआमपणे पानटपर्‍यांवर गुटख्याची विक्री होत असताना अन्न व औषध व पोलिस प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने गुटखा विक्रेत्यांचे फावले आहे.

14 हजारांचा मुद्देमाल जप्त : टपरीला लावले सील
जळगाव अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे व अन्न व सुरक्षा अधिकारी शरद पवार यांच्या पथकाने जळगाव रोडवरील गायत्री पान सेंटरवर छापा मारीत पानटपरीतून राज्यात प्रतिबंधीत असलेला पानमसाला, सुगंधी तंबाखू तसेच सुगंधी सुपारी असा एकूण 14 हजारांचा साठा जप्त केला. याप्रकरणी शरद पवार यांच्या फिर्यादीवरून संशयित विशाल प्रकाश जोशी (24, रा.जळगाव रोड, भुसावळ) याच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तर पानटपरीला अन्न व औषध प्रशासनाने सील ठोकले आहे. दरम्यान, संशयितांवर कारवाई तसेच गुटखा कुठून आणला याबाबत आता शहर पोलिसांकडून अधिक तपास केला जाणार आहे.



एप्रिल महिन्यात साडेचार लाखांचा साठा जप्त
शहर पोलिस ठाण्यासमोरील वसंत टॉकीज जवळील गायत्री पान सेंटरसह जळगाव रोडवरील टपरीवरून तसेच संशयिताच्या घरातून तब्बल चार लाख 51 हजार 824 रुपयांचा राज्यात प्रतिबंधीत गुटखा व विदेशी सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला होता तसेच तिघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, शहरात दर महिन्याला लाखोंच्या गुटख्याची उलाढाल होेते मात्र ठोस कारवाई होत नसल्याने किरकोळ व घाऊक विक्रेत्यांचे फावले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !