दहिगावात फटाके फोडल्यावरून वाद : दोघे जखमी, चौघांविरुद्ध गुन्हा
यावल : तालुक्यातील दहिगावात शुक्रवारी रात्री एका सामाजिक मिरवणुकीत घरासमोर फटाके फोडल्याच्या कारणावरून शाब्दीक वाद हाणामारीपर्यंत पोहोचल्याने तिघे जखमी झाले. या घटनेमुळे गावात तणावपुर्ण शांतता असून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दहिगावात शुक्रवार, 7 फेब्रवारी रोजी एका सामाजिक कार्यक्रमाची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक गावातील पाटील वाड्यातील जय भवानी चौकातील सार्वजनिक ठिकाणी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास आल्यानंतर अजय बाळू अडकमोल (26), करण नाना सोनवणे (20), गौरव दिलीप पाटील (27) आणि विजय नवल पाटील (30) या चौघांमध्ये फटाके फोडण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाल्याने या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. यात दोन तरूण जखमी झाले. दहिगाव पोलिस स्टेशन कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी नेताजी पंडीत वंजारी यांच्या फिर्यादीवरून चौघा तरूणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांर्थीय लक्षात घेता पोलिस निरीक्षक अरूण धनवडे, उपिनिरीक्षक जितेंद्र खैरनार आदी पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावात तणावपुर्ण शांतता असून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

