भुसावळ-बडनेरा मेमूचे खासदार रक्षा खडसेंच्या हस्ते उद्घाटन


भुसावळ- भुसावळ-बडनेरा दरम्यान 1 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या मेमूचे खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते रविवारी सकाळी हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले. खासदार खडसे या दिल्ली येथे होत असलेल्या निवडणुकीमुळे व्यस्त असल्याने त्यांनी रेल्वे प्रशासनाला रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी 1 फेब्रुवारीपासून गाडी सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या मात्र गाडीचे उद्घाटन झाले नसल्याने रविवारी लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकार्‍यांच्या उपस्थितीत ते करण्यात आले. प्रसंगी मेमूमधील रेल्वे प्रवाशांसाठी असलेल्या सोयी-सुविधांची खासदारांना माहिती देण्यात आली.

यांची होती उपस्थिती
रविवारी सकाळी 61101 भुसावळ-बडनेरा मेमू ट्रेनला खासदार रक्षा खडसे यांच्यासह आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी हिरवी झेंडी दाखवली. वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा, वरीष्ठ मंडळ अभियंता गृह व पर्यावरण प्रबंधक रामचंद्रन, वरीष्ठ मंडळ अभियंता लक्ष्मीनारायण मंडळ, वाणिज्य प्रबंधक बी.अरुण कुमार, सहाय्यक प्रबंधक अजय कुमार, स्टेशन डायरेक्टर जी.आर.अय्यर, स्टेशन प्रबंधक मनोज श्रीवास्तव व रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !