मुक्ताईनगरचे उपनिरीक्षक निलेश सोळंके यांचा विशेष सेवा पदकाने सन्मान
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक निलेश सोळंके यांनी नक्षलग्रस्त भागात केलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी खडतर व विशेष सेवा पदक देऊन स्वातंत्र्यदिनी पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. उपनिरीक्षक निलेश सोळंके यांनी गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील रेपणपल्ली, आहेरी व कटेझरी अशा पोलिस ठाण्यात त्यांनी त्यांनी 2014 ते 2017 दरम्यान सेवा बजावली आहे. गडचिरोली या नक्षलग्रस्त भागात खडतर सेवा बजावलयने जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी त्यांना खडतर व विशेष सेवा पदक देऊन स्वातंत्र्यदिनी गौरवल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.