नेरनजीक नाशिकच्या शेतमजुराचा खून : तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा


नेर : नेर गावाजवळील महालकाळी शिवारातील विजय मुरलीधर पाटील यांच्या शेतात विहिर खोदकामासाठी नाशिकहून आलेल्या फारूक (38) नामक शेतमजुराचा त्याच्याच सहकार्‍यांनी खून केल्याचा संशय आहे. ही घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणी शंकर उर्फ प्रफुल्ल शंकर पांडव (बुद्ध कॉलनी, सीएसटी रोड, गरीबनवाळ बिल्डींग समोर, कुर्ला पश्‍चिम, मुंबई), तसेच शंकर व एकनाथ (वय अंदाजे 30 व 35, पूर्ण नाव व गाव माहित) नाही यांच्याविरूद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात पिंटू अंबर वाचकर यांच्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !