यावल शहरात भीषण अपघात : दुचाकीस्वार जागीच ठार

भरधाव कारने दुचाकीला उडवले : चारचाकी चालकाविरोधात गुन्हा


Fatal accident in Yaval city : Bike rider killed on the spot यावल : शहरातून मार्गस्थ होणार्‍या अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर शहरातील फैजपूर रस्त्यावर पेट्रोल पंपासमोर दुचाकीला कारने मागून धडक दिल्याने 45 वर्षीय दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धडक इतकी भीषण होती की दुचाकी स्वार हा फुटबॉलसारखा वाहनावरून हवेत उडत जमिनीवर कोसळला. याप्रकरणी यावल पोलि ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला.

दुचाकीस्वार फुटबॉलसारखा हवेत उडाला
यावल शहरातून मार्गस्थ होणार्‍या अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर फैजपूर रस्त्यावर शहराच्या बाहेर जातांना पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपासमोर गुरुवारी सायंकाळी दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.वाय. 8205) वर सैय्यद खलील सैय्यद हमीद कुरेशी (45, रा.डांगपूरा, मन्यारवाडा, यावल) हे फैजपूरकडे जात असताना त्यांच्यामागून कार (क्रमांक एम.एच.04 डी.एन.2627) घेऊन मोहसीन खान मुक्तार खान (यावल) हा भरधाव वेगाने जात असताना मागूनच त्याने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार दुचाकीवरून फुटबॉलसारखा हवेत उडाला व कारवर कोसळला. यात त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. घटनास्थळावरून त्याला तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले व नंतर तेथून पुढील उपचाराकरीता जळगाव हलवण्यात आले. उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह परत यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.



नागरीकांची मोठी गर्दी
अपघाताची माहिती शहरात वार्‍या सारखी पसरली व रुग्णालयात नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. रात्री उशीरा याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अपघाताच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातग्रस्त वाहन यावल पोलिसांनी ताब्यात घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !