मुंबईत युटीएस अॅपद्वारे एकाच दिवशी 9 लाख तिकीट विक्री
भुसावळ : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात एकाच दिवसात 9 लाख 11 हजार प्रवाशांनी अॅपद्वारे तिकीटे काढली. रेेल्वे प्रशासनाने युटीएस अॅपद्वारे तिकीट काढण्याची सोय प्रवाशांसाठी उपलब्ध केल्याने पाच टक्के बोनस शिवाय युटीएस अॅपद्वारे सीजन तिकिटांची सहजतेने होणारी बुकिंग यामुळे कागदाचीही बचत होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मुंबई विभागात यापूर्वी 16 डिसेंबरला 8 लाख 33 हजार तिकीटे अॅपद्वारे विक्री झाली होती. हा विक्रम शनिवारी मोडीत निघाल्याचे रेल्वेच्या जनसंपर्क विभागातर्फे सांगण्यात आले.

