लाचखोर फौजदार एक लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
Bribery Faujdar caught in ACB’s net while accepting a bribe of Rs one lakh सोलापूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याचे फौजदार विक्रम प्रतापसिंह रजपूत (40) यांना एक लाखांची लाच घेताना एसीबीने अटक केल्यानंतर पोलिसात वर्तुळात खळबळ उडाली. गुन्ह्यात मदत करण्यासाठी रजपूत यांनी दोन लाखांची लाच मागून एका लाखात तडजोड केली मात्र तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी तक्रार नोंदवली.
कारवाई न करण्यासाठी मागितली लाच
एमआयडीसी पोलिसात तक्रारदाराच्या मित्राविरुद्ध अॅट्रॉसिटीसह अन्य गुन्हे दाखल असल्याने या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच सीआरपीसी कलम 107 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी फौजदार विक्रम प्रतापसिंह रजपूत यांनी स्वत:सह पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या नावे दोन लाखांची मागणी केली. तडजोडीने ती रक्कम एक लाखांवर आणून स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे 6 ऑक्टोबर 2023 रोजी केलेल्या पडताळणी कारवाईत निष्पन्न झाले.


यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे-खराडे, उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरीषकुमार सोनवणे, श्रीराम घुगे, अतुल घाडगे, संतोष नरोटे, स्वामीराव जाधव, गजानन किणगी, श्याम सुरवसे आदींच्या पथकाने यशस्वी केला.
