मृत्यूची झुंज संपली : हिंगणघाटमधील पीडीतेचा अखेर मृत्यू
वर्धा : हिंगणघाट घटनेतील पीडीतेची मृत्यूची झुंज अखेर सातव्या दिवशी संपली व सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास पीडीतेचा मृत्यू झाला. सात दिवसांपासून सुरू असलेली पीडितेची झुंज अखेर अपयशी ठरली. पीडीतेचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून कसोशीने उपचार सुरू असतानाच ऑरेंज सिटी रुग्णालयात तिची प्राणज्योत मालवली. 7 फेब्रुवारीपासूनच या पीडीतेची प्रकृती चिंताजनक होती.