शेख जावेद शेख याकुब यांना खांना खान्देश गौरव पुरस्कार


यावल : शहरातील सर सैय्यद अहमद खान उर्दू प्रायमरीचे शिक्षक शेख जावेद शेख याकुब यांना जळगाव येथील एका कार्यक्रमात आदिल शाह फारूकी फौंडेशनच्या वतीने खान्देश गौरव पुरस्कार देवून गौरवण्यात आले. शेख जावेद यांनी शैक्षणिक क्षेत्रात तसेच सामाजिक कार्याच्या माध्यमातून केलेल्या महत्वपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
जळगावच्या अल्पबचत भवनात झालेल्या कार्यक्रमात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. विविध क्षेत्रातील 35 मान्यवरांना यावेळी पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमास हकीम आर.चौधरी, अली अंजुम रजवी, फिरोज शेख, नुरोददीन मुल्लाजी, डॉ.शकील सईद, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील, दिगंबर पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी शेख अय्युब, शेख अल्ताफ, जुबेर शाह, शेख जावीद, रोशनशाह, आसीफ शाह आदींनी परीश्रम घेतले. आभार संस्थाध्यक्ष फारूक शाह नोमानी यांनी मानले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !