विद्युत शॉक लागल्याने हिवरखेडा दिगरच्या तरुणाचा मृत्यू


Youth of Hiwarkheda Digar died due to electric shock जामनेर : जामनेर तालुक्यातील हिवरखेडा दिगर येथील रयोगेश अशोक पाटील (करंजे) या तरुणाचा शेतात कृषी पंप सुरू असताना शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी शेतात घडली.

जागीच झाला करुण अंत
योगेश हा तरुण उच्चशिक्षीत होता. रविवारी शेतात कृषी पंप सुरू करताना त्याने पायातील चप्पल काढून ठेवली व अवकाळी पावसामुळे शेतजमीन ओली असल्याने त्यास पंप सुरू करताच इलेक्ट्रीक शॉक बसला व जागीच त्याचा करुण अंत झाला. थोड्या अंतरावर शेततळ्याचे काम सुरू आहे. असून ठिकाणावरून घरी परतणार्‍या छोट्या ओम व जय या मुलांना योगेश बेशुद्धावस्थेत दिसल्याने त्यांनी ही घटना गावात कळवली. शरद पाटील, भास्कर पाटील व गावातील तरुणांसह नागरीकांनी धाव घेतली. योगेशला तातडीने पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केल्याने गावावर शोककळा पसरली.


कॉपी करू नका.