भुसावळात स्नेहतरंग कार्यक्रमातून शिक्षकांनी केले कलागुणांचे सादरीकरण


भुसावळ- गणेश वंदना, पारंपरीक महाराष्ट्राची लोकधारा, नाटीका, मराठी विषयाची गोडवे गाणारी एकांकिका, समूह गीत, स्वच्छ अभियान, संगीत, नृत्य, नाटिका, देशभक्तीपर गीत, बेटी बचाव बेटी पढाव, शिक्षणाचे महत्त्व या मधून दोनशे शिक्षकांनी आपल्या अंगी असलेले विविध गुणांचे प्रगटीकरण सेंट अलॉयसेस हायस्कूलमध्ये आयोजित स्नेह तरंग या कार्यक्रमातून केले व उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. शिक्षक विद्यार्थ्यांसाठी नेहमीच विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात त्यांच्या अंगी असलेले गुण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कार्यक्रमांतून प्रगटीकरण होत असल्यानेच अशा शिक्षकांचे कार्यक्रमाचे आयोजन केले पाहिजे अशा प्रकारची संकल्पना गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान यांनी मांडताच तालुक्यातील सर्व संघटनांनी एकत्रीत येऊन दोनदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
शनिवारी क्रीडा परीषद घेण्यात आली यामध्ये क्रिकेट, धावण्याची स्पर्धा, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, यासह इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले तर शनिवारी दुपारी सेंट अलॉयसेस हायस्कूलमध्ये शिक्षकांच्या स्नेहतरंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान, शिक्षण विस्तार अधिकारी रागिनी चव्हाण, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता शैलेश पाटील, केंद्रप्रमुख संजय श्रीखंडे, नलिनी झांबरे, बी.डी.बोदडे आदी उपस्थित होते.

समारोपास यांची होती उपस्थिती
समारोपाला जिल्हा परीषदेचे शिक्षण सभापती रवींद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील व मान्यवर उपस्थित होते. यावेळी क्रीडा परीषदेतील विजयी संघ व खेळाडु तसेच वैयक्तिक नृत्य सांगिक नृत्य वैयक्तिक गीत गायन सामूहिक गीत गायन एकांकिका नाटिका यामधील विजयी कलावंतांना पारीतोषिक देण्यात आले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान यांनी केले. तर सूत्रसंचालन दीपक पाटील व निशा पाटील यांनी तसेच आभार गणेश फेगडे यांनी मानले. परीक्षणाचे काम संगीत शिक्षक सुनील पवार, डी एम हलोडे, मनोज कुलकर्णी यांनी पाहिले. यशस्वीतेसाठी समन्वय समितीचे अध्यक्ष प्रदीप सोनवणे व सर्व संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !