भुसावळच्या राजश्री नेवे यांना खान्देश गौरव पुरस्कार


भुसावळ- शहरातील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा राजेश्री उमेश नेवे यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नुकताच अडावद ता.चोपडा येथील आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने खान्देश गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.शिल्ड, मानपत्र व मेडल असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अध्यक्षस्थानी माजी मंत्री गुलाबराव देवकर होते. दीपप्रज्वालन अंकुर साहित्य परीषदेचे सह सचिव हकीम चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. संस्थाध्यक्ष फारुख शहा नौमानी यांनी प्रास्ताविक केले तसेच सुरेश जनार्दन बोरसे यांनी सूत्रसंचालन केले.

35 मान्यवरांचा कार्यक्रमात सन्मान
35 मान्यवरांचा कार्यक्रमात सन्मानयावेळी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, पत्रकारिता, लेखन, काव्य आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विविध क्षेत्रातील 35 मान्यवरांनाही पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील, अली अंजुम रज्वी, जावेद शेख, दिगंबर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात रीयाझ शेख, नुरुद्दीन मुल्लाजी, सुनीता अशोकराव, फिरोज शेख, गणेश परदेशी, हारून अन्सारी, अजमल शाह असगर शाह, फारुख शेख आदी मान्यवर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शेख जाजीद, शेख अय्युब, जुबेर शाह, रोशन शह, शेख अल्ताफ, जावेद शेख, आसीफ शहा आदींनी परीश्रम घेतले. आभार संस्थाध्यक्ष फारूक शहा नौमानी यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !