57 वर्षातील जुन्या आठवणींना विद्यार्थ्यांनी दिला उजाळा


भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

भुसावळ : शहरातील कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित माजी विद्यार्थ्यांचा नुकताच मेळावा झाला. 1963 मध्ये महाविद्यालयाची स्थापना झाल्याने त्यावेळी शिक्षण घेणार्‍यांपासून 2020 पर्यंत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या मेळाव्याला सुमारे 700 हून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यांची मेळाव्यास उपस्थिती
अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी विष्णू चौधरी होते. उद्घाटन माजी विद्यार्थी व विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी व ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, डॉ.मोहन फालक, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष व माजी विद्यार्थी संजयकुमारजी नाहाटा, नगराध्यक्ष व माजी विद्यार्थी रमण भोळे, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे संचालक तथा माजी विद्यार्थी शाम दरगड, माजी विद्यार्थी अनिल भोळे, नीळकंठ भारंबे, प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, उपप्राचार्य डॉ.एन.ई.भंगाळे, उपप्राचार्य प्रा.शैलेश पाटील, पर्यवेक्षक प्रा.यु.बी.नंदाने, प्रा.ई.जी.नेहेते, प्रा. प्रशांत व्ही.पाटील, आशिष चौधरी, प्रा.डॉ.जी.आर.वाणी, प्रा.हर्षल पाटील, प्रा.डॉ.गौरी एम.पाटील, मनोज बियाणी, प्रा.स्मिता बेंडाळे, प्रा.स्वाती शेळके, संतोष विनंते, राजू पारीख, किरण महाजन यांची उपस्थिती होती. या मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बहुसंख्य माजी विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे दर्शन सिनेगीत, डान्स व मिमिक्री तसेच इत्यादी कलाप्रकारांनी सादर केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !