सावद्यात कत्तलीपूर्वीच 13 उंटाची सुटका : दोघांना अटक


Rescue of 13 Camels before Slaughter in Savada : Two arrested सावदा : कत्तलीसाठी निर्दयीपणे कोंबून 13 उंट नेले जात असताना सावदा पालिसांनी कारवाई करीत 13 उंटांची सुटका केली तर दोघांना अटक केली. राजस्थान, मध्यप्रदेश व महाराष्ट्र अशा दोन आरटीओ बॉर्डरवरून उंट वाहतुकीचा कुठलाही परवाना नसताना आयशर वाहन महाराष्ट्रात दाखल झाले मात्र सावदा पोलिसांनी कारवाई करीत आरोपींना अटक केली तर राज्यातून अवैध वाहतूक होत असताना यंत्रणा आलबेल कशी? असा प्रश्नही उपस्थित झाला.

13 उंटांची सुटका
सावदा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील लुमखेडा, शिवार हतनूर धरणाचे पुलाजवळ भारतीय वंशाचे दोन लाख 85 हजार रुपये किंमतीचे एकूण 13 उंट अतिशय निर्दयीपणे दाटीवाटीने कोंबून व त्यांचे पाय व तोंड दोरीने बांधून उंट वाहतुकीचा कुठलाही परवाना नसताना बेकायदेशीररीत्या कत्तलीसाठी नेले जात होते मात्र सावदा पोलिसांनी दहा लाख रुपये किंमतीची आयशर (क्रं.सी.जी. 12 बी.एच.3281 ) ताब्यात घेतले तर दोघांना ताब्यात घेतले तर एक संशयित पसार झाला.



दोघांना केली अटक
पोलिस कॉन्स्टेबल विनोद भीमराव दामोदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मकबूल खान फकरुद्दीन खान (45, रा.वरखेडा आष्टा, जि.सिहोर), अरबाज खान शकील खान (21, अमरपुरा, जिल्हा देवास, मध्यप्रदेश) व खालिद खान खलील खान (नोशेराबाद देवास, मध्यप्रदेश) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. खालीद खान पसार असून अन्य दोघांना अटक करण्यात आली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अन्वर तडवी व पोलिस नाईक मोहसीन पठाण करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !