वरणगावात विद्युत डीपी पेटली : सुदैवाने जीवीतहानी टळली


वरणगाव : विल्हाळा रोडकडे जाणर्‍या महात्मा गांधी विद्यालयाच्या कुंपणाला लागून असलेल्या इलेक्ट्रीक डीपीने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवारी सकाळी 9 .15 वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने जीवितहानी टळली मात्र वीज वितरण कंपनीकडे अशा प्रकारच्या अपघातासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याचे उघड झाले.महात्मा गांधी विद्यालयाच्या कुंपणाला लागून वीज वितरण कंपनीची 100 वॅट असलेल्या डीपीला अचानक शॉर्ट सर्किट होवून सोमवारी सकाळी 9.15 वाजता आग लागली तर अर्धा-पाऊण तासानंतर विद्यत कर्मचारी आले मात्र तोपर्यंत नागरीकांनी माती टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला तसेच नगराध्यक्ष सनील काळे यांनी देशमुख पेट्रोल पंपावर घटना कळवल्यानंतर तेथील आग विझवण्याच्या सिलिंडरद्वारे कर्मचार्‍यांनी प्रयत्न केला.

10.30 वाजेच्या सुमारास आग आटोक्यात
प्रसंगी नगरसेविका वैशाली देशमुख व संभाजी देशमुख आले त्यांनी आपल्या पंपावरील दहा सिलेंडच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु आग विझत नसल्याने आयुध निर्माणीतील अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर सकाळी 10.30 वाजता आगीवर नियंत्रण मिळवता आले. या घटनेमुळे रस्त्याला लागून असलेल्या घरांमधील नागरीक घाबरून लांब रस्त्यावर उभे होते तसेच रस्त्याने ये-जा करणार्‍या वाहनधारकांची वाहतूक थांबवण्यात आली. अग्निशमन दलाचे डी.व्ही.पाटील, एम.पी.चौधरी, एस.एम.मेढे, एस.एम.भालेराव, एन.आर.वारके, एस.शेख यांनी आग विझवली. तसेच बसस्थानक ते रेल्वे स्टेशन रोड व वामन नगर भागात सहा तास वीजपुरवठा खंडित राहिल्याचा व्यावसायीकांना मात्र फटका बसला आहे. दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशन मध्येच आग विझवण्याचे साहित्य असून आमच्या कार्यालयामध्ये अशी कोणत्याही प्रकारचे साहित्य उपलब्ध नसल्याचे सहाय्यक अभियंता ए.एस.कुशवा म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !