नाशिक पुन्हा खुनाने हादरले : प्रॉपर्टी वादातून मोठ्या भावाची हत्या


Nashik again rocked by murder : Elder brother killed due to property dispute नाशिक : नाशिकमध्ये गुन्हेगारी कारवाया थांबायला तयार नाहीत. प्रॉपर्टी वादातून लहान भावाने मोठ्या भावाचीहत्या केल्याची धक्कादायक घटना . उपनगरातील रामदास स्वामी नगरातील मानस अपार्टमेंटमधील बिल्डिंग नंबर 1 मध्ये सोमवारी सकाळी अकरा वाजता घडली. चंद्रकांत जाधव असे मयताचे तर आकाश जाधव असे संशयिताचे नाव आहे.

प्रॉपर्टी वादातून हत्या
दोन भावांमध्ये सुरुवातीला वाद झाला नंतर हाणामारी झाली. त्यानंतर संतप्त झालेल्या लहान भावाने मोठ्या भावाला बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर त्याने धारदार वस्तूने व दगडी वरवंडा टाकून मोठ्या भावाचा खून केला. चंद्रकांत जाधव आणि त्याचा लहान भाऊ आकाश जाधव हे एकाच फ्लॅटमध्ये राहत होते. या दोघांमध्ये फ्लॅट विक्रीच्या कारणावरून भांडण झाले व ते शेवटी प्रकरण खूनापर्यंत गेले.



पोलिस अधिकार्‍यांची धाव
उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, उपनगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे, सहा.निरीक्षक बाळासाहेब दुकळेसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर लहान भाऊ आकाश जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !