महिला वनकर्मचार्‍यास मारहाण : धरणगाव पोलिसात एकाविरोधात गुन्हा


Beating up a female forest employee : A case has been registered against one in Dharangaon police धरणगाव : वनविभागाच्या हद्दीतील झाडे तोडून शेतजमीन तयार करताना विरोध केल्याच्या वादातून 30 वर्षीय महिला वनकर्मचार्‍यास मारहाण करण्यात आली तसेच शासकीय कामात अडथळा आणण्यात आला. ही घटना धरणगाव तालुक्यातील एकलग्न शिवारातील वनविभागात तसेच वनविभागाच्या कर्मचारी निवासस्थानाजवळ 12 रोजी सकाळी 9 ते 13 रोजीच्या सकाळी 8.30 दरम्यान घडली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात भास्कर साहेबराव वाघ (एकलग्न, ता.धरणगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अरेरावी करीत महिला कर्मचार्‍याला धक्काबुक्की
धरणगाव तालुक्यातील एकलग्न शिवारातील वनविभागात 30 वर्षीय महिला कर्मचारी सुरेखा सुभाष पिंपळे (30, म्हसावद रोड एरंडोल) कार्यरत आहेत. संशयित भास्कर साहेबराव वाघ (एकलग्न, ता.धरणगाव) यांनी वनविभागाच्या जागेवरील झाडे तोडून तेथे शेतजमीन तयार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यास महिला कर्मचार्‍याने विरोध केल्यानंतर महिला कर्मचार्‍याशी अरेरावी करीत त्यांचा हार पिरगाळून बुक्का मारण्यात आला तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला. महिला कर्मचार्‍याच्या तक्रारीवरवून शासकीय कामात अडथळा तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन के. शिरसाठ करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !