भरधाव डंपरने उडवल्याने सात वर्षीय बालिकेचा मृत्यू


जळगाव शहरातील हॉटेल गौरवजवळ अपघात : चौघे जखमी

जळगाव- भुसावळकडून जळगावकडे येणार्‍या भरधाव डंपरने जोरदार धडक दिल्याने भुसावळातील स्वरा मनवाणी या सात वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शहरातील हॉटेल गौरवसमोर शनिवारी रात्री घडली तर या अपघाता चार जण जखमी झाले. भुसावळ शहरातील गौतम मनवाणी (35), प्रीती मनवाणी (30), माही मनवाणी (12) तसेच स्वरा मनवाणी (7) तसेच वैभव मुलचंदाणी (30, रा़ हौशंगाबाद, मध्यप्रदेश) हे शनिवारी चरचाकी (एम.एच.19.बी.जे.968) ने जळगाव शहरात किर्तीका मनवाणी हिचा वाढदिवसासाठी आले होते. वाढदिवसानतर सर्व कुटुंब चित्रपट पाहण्यासाठी खान्देश सेंट्रल मॉल येथे आले. त्यानंतर रात्री तेथूनच मनवाणी कुटूंब आणि वैभव मुलचंदाणी हे त्यांच्या कारने भुसावळकडे निघाले असताना भुसावळकडून जळगावकड येणारा डंपर (एम.एच.21.एक्स.5193 ) ने चारचाकीला धडक दिली. या अपघातात स्वरा मनवाणी या सात वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील गौतम मनवाणी, वैभव मुलचंदाणी, प्रीती मनवाणी, माही मनवाणी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


कॉपी करू नका.