जळगावात तहसीलला आग : निवडणुकीसह पुरवठा विभागाची कागदपत्रे खाक


जळगाव : बळीराम पेठेतील तहसील कार्यालयातील रेकॉर्ड कक्षाला शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत निवडणूक आणि पुरवठा विभागाशी संबंधीत कागदपत्र जळून खाक झाल्याची घटना सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. आगीची माहिती कळताच जिल्हा परीषद कार्यालयातील वॉचमनद्वारे पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयात कळवण्यात आल्यानंतर अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले मात्र तो पर्यंत आगीचा भडका अधिक वाढल्याने महत्वपूर्ण कागदपत्रे यात जळाल्याचे सांगण्यात आले. प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार वैशाली हिंगे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, तहसीलला लागून मोठ्या प्रमाणावर विद्युत तारा गेल्या असून त्यात शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगळवारी सकाळी प्रशासनाच्या पाहणीअंती नेमके काय नुकसान झाले हे सांगता येणार असल्याचे तहसीलच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !