भुसावळातील अल्पवयीन तरुणीवर औरंगाबादमध्ये अत्याचार


भुसावळ : शहरातील अल्पवयीन तरुणीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार केल्याप्रकरणी संशयीत आरोपी शाहरुख उर्फ रघु (पूर्ण नाव, गाव माहित नाही) याच्याविरुद्ध सोमवार, 10 रोजी रात्री उशिरा बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. घरकाम न केल्याने आई रागावल्यानंतर अल्पवयीन तरुणीने संतापाच्या भरात घर सोडल्यानंतर संशयीत आरोपी शाहरूखशी भेट झाल्यानंतर त्याने लग्नाचे आमिष देत तिला शहरातील खाचणे हॉल, नंदनवन कॉलनी जवळील स्वामी समर्थ मंदिराजवळ थांबवल्यानंतर दुसर्‍या दिवशी औरंगाबादमधील आझाद चौकातील अपार्टमेंटमध्ये 4 ते 6 फेब्रुवारीदरम्यान दरम्यान अत्याचार केल्याचा आरोप आहे. दरम्यान, संशयीत आरोपी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगाराकडे कामाला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध सुरू असून पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !