दोन जिवंत काडतूस व कट्ट्यासह बर्‍हाणपूरातील आरोपी जाळ्यात

रावेर पोलिसांची गोपनीय माहितीच्या आधारे कामगिरी : शस्त्र तस्करी ऐरणीवर


Accused in Barhanpur with two live cartridges and a knife रावेर : गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूसासह बर्‍हाणपूरातील हद्दपार आरोपीला रावेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुजाहिद उर्फ माया ईब्राहम खान (27, गुलाबगंज लालबाग, बर्‍हाणपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही कारवाई कल्याणी बिअर बारसमोर शुक्रवारी रात्री पावणेसात वाजता करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेर शहरातील बर्‍हाणपूर रोडवरील कल्याणी बियर बार समोर 25 ते 26 वयोगटातील व अंगात निळसर रंगाचा शर्ट व राखाडी काळ्या रंगाची जीन्स पँन्ट व गळ्याभोवती फिक्कट लाल भगवा रंगाचा लांब रूमाल परीधान केलेला संशयित कट्ट्यासह येणार असल्याची गोपनीय माहिती रावेर पोलिसांना मिळाल्यानंतर फौजदार सचिन नवले आणि सहकार्‍यांनी सापळा लावला. संशयित येताच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. अंगझडतीत संशयिताच्या कमरेला गावठी कट्टा व पँटच्या डाव्या खिश्यात दोन पितळे राऊंड मिळाल्याने ते जप्त करण्यात आले.



यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई रावेरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सचिन नवले, हवालदार ईश्वर चव्हाण, कॉन्स्टेबल सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे यांच्या पथकाने केली. पुढील तपास फौजदार सचिन नवले करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !