पीएपी कर्मचार्‍याचा मृत्यू : तालुका पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले


भुसावळ : पायात सुरक्षा बुट नसल्याच्या कारणावरून सुरक्षा रक्षकांनी दीपनगर केंद्रात कॅन्टींगमध्ये चहा घेण्यास जात असलेल्या संजय बळीराम बर्‍हाटे (47, रा.फेकरी) यांना बेदम मारहाण केल्याने त्यांचा सोमवारी रात्री 11.30 वाजता झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्या परीसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या आधारे पोलिसांकडून पुरावे गोळा केले जात आहे. या प्रकरणी न्यायालयाने सुरक्षा अधिकारी संजय आनंदा लोकरे, सागर संदीप मोरे, राजेश ज्ञानबा बनसोड (दोन्ही फेकरी) यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे तिन्ही संशयीतांची रवानगी जळगाव सबजेलला करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार पुढील तपास करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !