भुसावळच्या युवकाचा नशिराबादजवळ अपघाती मृत्यू
भुसावळ : नशिराबाद-भुसावळ मार्गावर मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मोटर सायकल व आयशर गाडीच्या झालेल्या अपघातात मोटर सायकलवरील प्रकाश वसंत कोयेकर (30, रा. खळवाडी) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती. प्रकाश यांच्या सोबत त्यांचा मित्र होता, मित्राच्या फिर्यादीवरून मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

