धक्कादायक : जेवण न दिल्याच्या रागातून पत्नीची हत्या ; आरोपी पतीला अटक


Shocking : Wife killed out of anger over not being given food ; Accused husband arrested पुणे  पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीची जेवण न दिल्याच्या कारणातून हत्या करणार्‍या पतीला अटक करण्यात आली. कात्रज येथील दत्तनगर परिसरात ही घटना घडली. संतप्त पतीने पत्नीने जेवण न दिल्याने आरोपीने तिच्या छातीवर बुक्का मारून तसेच बेदम मारहाण करून तिची हत्या केली. तानाजी कांबळे असे अटकेतील आरोपी पतीचे तर माधुरी कांबळे असे मयत पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली.

मद्याच्या नशेत कृत्याची माहिती
हा सगळा प्रकार घडला तेव्हा आरोपी पतीने मद्यपान केल्याचे सूत्रांनी सांगितले. क्षुल्लक कारणावरुन राग अनावर झाल्याने आरोपीने पत्नीची हत्या केली. . याप्रकरणी माधुरीचा मुलगा पियुष कांबळे याने पोलिसात तक्रार दिल्यानंतर आरोपी असलेल्या पित्याला अटक करण्यात आली. आरोपी पती व्यावसायाने पेंटर असून शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास तानाजी नेहमीप्रमाणे मद्यपान करून घरी आला. पत्नीला जेवायला वाढण्यास सांगितले. यावर तिने त्याला जेवण न बनवल्याचे उत्तर दिले. जेवण न दिल्याच्या रागातून तानाजीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. यादरम्यान त्याने पत्नीच्या छातीवर मारहाण केल्यानंतर तिचा मृत्यू ओढवला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !