660 मेगावॅट प्रकल्पात मोठ्या कंत्राटांऐवजी छोटे-छोटे कंत्राट करावेत


वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेची व्यवस्थापकीय संचालकांकडे मागणी

दीपनगर : 660 सुपरक्रिटीकल मेगावॅट प्रकल्पाच्या सीएसआर अंतर्गत 17 गावांचे मिळून एकूच पावणे चार कोटींची मोठी निविदा काढण्यात आली असून ही निविदा रद्द करून छोटी-छोटी निविदा करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेच्या वतीने महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे करण्यात आली आहे.

छोट्या कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ
660 मेगावॅट सुपरक्रिटीकल प्रकल्पाचे काम भेल कंपनीला देण्यात आले आहे मात्र या व्यतिरिक्त प्रकल्पाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या निविदा या मोठ्या प्रमाणात काढत असल्याने लहान कंत्राटदार सदर निविदा प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचा प्रसंग आला आहे. नुकतेच 660 मेगावॅट स्थापत्य विभागा मार्फत सीएसआर अंतर्गत येणार्‍या निंभोरा, फेकरी, पिंप्रीसेकम, फुलगाव,जाडगाव आणि परीसरातील मिळून 17 गावातील गटारी, रस्ते, व इतर कामे करण्याचे जवळपास पावणे चार कोटी रुपयांची एकच निविदा काढण्यात आली परंतु या निविदा प्रक्रियेत स्थानिक एकही कंत्राटदार या निविदा प्रक्रिया पूर्ण करू शकत नसल्याने ही निविदा रद्द करून छोट्या-छोट्या निविदा करण्यात यावी व स्थानिक पातळीवर प्रशासनाने सीएसआर अंतर्गत निघणारी कामे लहान कंत्राटदारांना देण्यात यावे, अशी मागणी संघटनेमार्फत करण्यात आली. याबाबत सबंधित अधिकारी यांना आदेश द्यावे अन्यथा न्यायालयात धाव घेतली जाईल, असा इशारा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुबारक पठाण यांनी दिला आहे. या आशयाचे निवेदन उर्जा मंत्री, डॉ.नितीन राऊत, अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक अध्यक्ष शैला ए., प्रकल्प संचालक व्हि थंगपंडियन, स्थापत्य मुख्य अभियंता अनंत देवतारे यांना देण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !