जबलपूर-कोईम्बतूर विशेष गाडी मार्चपर्यंत धावणर


भुसावळ : रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांची गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाकडून जबलपूर-कोईम्बतूर विशेष गाडी 28 मार्चपर्यंत रेल्वे प्रशासनाकडून चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अप जबलपूर-कोइम्बतूर-जबलपूर ही गाडी शनिवार, 29 फेब्रुवारी ते 28 मार्चपर्यत चालविणार आहे. डाऊन (02198) कोईम्बतूर-जबलपूर विशेष गाडी सोमवार, 2 मार्चंपर्यंत सुटणार आहे. ही गाडी 2 ते 30 मार्चपर्यत चालणार आहे. ही गाडी नरसिंगपूर, गाडरवारा, पिपरीया, इटारसी, हरदा, खंडवा, भुसावळ, मनमाड, ईगतपुपरी, पनवेल, रोहा. खेड, चिपळून, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिवम, कारवार, कुमता, कुंडापूरा, उड्डपी, मुल्की, थोकुर, मंगलोर, कसारअगोद, पय्यानूर, कन्नूर, तेल्लीचेरी, वदाकारा, कालीकट, तिरूर, शोनूर, पालघाट, पोधापूर या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीला एक एसी -2, चार एसी – 3, 11 आरक्षित डबे आणि चार जनरल डबे राहणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !