भुसावळ-भादलीदरम्यान ब्लॉक : काशीसह कटनी पॅसेंजर खोळंबली
दोन्ही बाजूकडील ब्लॉक रेल्वे प्रवासी संतप्त : रेल्वेच्या कारभारावर टिका
भुसावळ : भुसावळ-भादली व भुसावळ-रावेरदरम्यान बुधवारी सकाळी घेतलेल्या ब्लॉकमुळे काशी एक्स्प्रेससह कटनी पॅसेंजर दोन्ही गाड्या व अडीच तास खोळंबल्याने रेल्वे प्रवाशांनी रेल्वेच्या कारभाराबाबत चांगलाच संताप व्यक्त केला. मध्ये रेल्वे प्रशासनाकडून बुधवारी भुसावळ-भादली दरम्यान सकाळी ब्लॉक घेतल्याने मुंबईकडे जाणारी काशी एक्स्प्रेस तब्बल सव्वातास भुसावळ जंक्शनवर थांबली होती तसेच भुसावळ-रावेर दरम्यानच्या कामासाठी घेतलेल्या ब्लॉकमुळे 9.30 वाजता सुटणारी भुसावळ -कटनी पॅसेजर ही गाडी दुपार 12 वाजता भुसावळ जंक्शनवरून सुटल्याने प्रवासी संतप्त झाले.
रेल्वेच्या ब्लॉकमुळे प्रवासी त्रस्त
बुधवारी सकाळी भुसावळ-रावेर मार्गावर निंभोरा स्टेशनजवळ रेल्वे रूळात खडी टाकण्यासाठी ब्लॉक घेण्यात आल्याने भुसावळ-कटनी पॅसेंजर सकाळी 9.30 ऐवजी दुपारी 12 वाजता सोडण्यात आली. या मार्गावर सकाळी 10.45 ते दुपारी 1.45 या वेळात ब्लॉक घेण्यात आला तसेच कटनी पॅसेजर ही गाडी दुसखेडा स्थानकावर आणि सावदा स्थानकावर प्रत्येकी अर्धा तास थांबवण्यात आल्याने प्रवासी अधिकच संतप्त झाले. दुसरीकडे भुसावळ-भादली दरम्यानच्या कामुळे बुधवारी सकाळी 10 ते 12 या वेळेतील ब्लॉकमुळे काशी एक्स्प्रेस ही गाडी भुसावळ जंक्शन स्थानकावर 1.15 मिनिटे थांबवून ठेवली आल्यानंतर दुपारी 12.15 वाजता गाडी मुंबईकडे रवाना झाल्याने प्रवाशांनी अधिकच संताप व्यक्त केला.

