आगामी सण-उत्सव शांततेत पार पाडा
बोदवडला शांतता समितीच्या बैठकीत उपअधीक्षक सुरेश जाधव
बोदवड : आगामी शिवजयंती व एकलव्य जयंती शांततेच्या मार्गाने पार पाडावी,कायद्याच्या चौकटीत राहून प्रत्येकाने जयंती साजरी करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक सुरेश जाधव यांनी येथे केले. बोदवड पोलिस स्टेशनमध्ये आगामी शिवजयंती व एकलव्य जयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक बुधवारी झाली. प्रसंगी पोलिस निरीक्षक सुनील खरे, पोलिस उपनिरीक्षक भाईदास मालचे उपस्थित होते. दरम्यान, उपअधीक्षक जाधव म्हणाले की, मिरवणुकीत डीजे लावण्यास बंदी असून तसा प्रकार आढळल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई त्यामुळे पारंपरीक वाद्यांचा मिरवणुकीत वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यांची होती उपस्थिती
बैठकीला शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष संभाजी जाधव, नगरपंचायत गटनेते कैलास चौधरी ,एकलव्य जयंती समितीचे विनोद मोरे, कालु गायकवाड, हर्षल बडगुजर, संजय वराडे, प्रमोद धामोडे, संजय काकडे, अनंता वाघ, अनिल देवकर, निवृत्ती ढोले, संजय गायकवाड यांच्यासह शिवप्रेमी व एकलव्य प्रेमींची उपस्थिती होती.

