ग्रामसेवकांच्या खुर्चीला हार घालत वाजवले ‘डफडे’


चिंचखेडसीमध्ये युवा सेनेचे अनोखे आंदोलन : महिनाभरापासून ग्रामसेवकांची प्रतीक्षा

बोदवड : तालुक्यातील चिंचखेडसीम येथील ग्रामसेवक महिनाभरापासून आले नसल्याने ग्रामस्थांची कामे खोळंबली आहेत. यापूर्वी दोन ते तीन वेळा युवा सेनेचे अनिल पाटील यांनी ग्रामस्थांच्या समस्या घेऊन गटविकास अधिकार्‍यांकडे तोंडी तक्रारी केल्या होत्या मात्र प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली न गेल्याने बुधवारी युवा सेनेने डफडे वाजवून ग्रामसेवकांच्या खुर्चीला हार घालत अनोखी गांधीगिरी आंदोलन केल्याने तालुक्यात हा अनोखा विषय चर्चेचा ठरला आहे.

आठ दिवसात ग्रामसेवक न दिल्यास तीव्र आंदोलन
गावात रोजगार हमी मष्टर, शालेय विद्यार्थ्यांना दाखले, उतारे, स्वच्छताबाबत अनेक प्रश्‍न असताना ग्रामसेवकांअभावी ग्रामस्थ त्रस्त आहेत. या संदर्भात प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी युवा सेनेचे अनिल पाटील, योगेश पाटील, गणेश पाटील, आकाश पाटील, मुकुंदा देवकर यांनी नागरीकांसह डफडे वाजवून ग्रामसेवकाच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी आंदोलन केले. तत्काळ आठ दिवसात ग्रामसेवक न दिल्यास युवासेना स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा युवासेनेचे अनिल पाटील यांनी दिला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !