यावल पोलिस निरीक्षकांचा उपक्रम : ‘टॉक विथ मॉर्निंग वॉक’


यावल : यावल पोलिस निरीक्षकांनी ‘टॉक विथ मॉर्निंग वॉक’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि सर्वसामान्य नागरीकांसह सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून गाव परीसरातील समस्या जाणून घेतल्या तर त्यांना कायद्यासदर्भात माहिती देवून मार्गदर्शन केले. दरम्यान, निरीक्षक धनवडे यांच्या विविधांगी उपक्रमांचे यावलकरांसह तालुक्यातील ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. .

निरीक्षकांचा 15 किलोमीटर पायदळी प्रवास
यावलचे पोलिस निरीक्षक अरूण धनवडे यांनी बुधवारी सकाळी यावल तालुक्यातील दहिगाव, सावखेडासीम, बोराळे, नायगाव या गावातील सर्वसामान्यांशी थेट गावात 15 किलोमीटर लांब पायदळी चालत जावुन ग्रामीण नागरिकांशी सुस्वाद साधला. त्यांना गावातील उघड्यावर शौच करणे, आपल्या गावात शांतता नांदावी अशा विविध विषयासह कायद्या सुव्यवस्थेसंदर्भात सविस्तर माहिती देवून त्यांनी मार्गदर्शन केले. दहिगाव येथे पत्रकार दिलीप महाजन, विजय भाऊ, दहिगावचे पोलीस पाटील संतोष पाटील, रवींद पाटील व ग्रामस्थ यांच्याशी तर सावखेडासीम येथे यावल पंचायत समितीचे सदस्य व गटनेते शेखर पाटील, सावखेडासीमचे पोलिस पाटील पंकज बडगुजर, राजेंद्र जयकर ग्रामस्थ त्याचप्रमाणे बोराळे येथील ग्रामस्थ आणि नायगाव येथे जनतेशी संपर्क साधला. पोलिस निरीक्षक अरूण धनवडे यांनी तालुक्यातीत ग्रामीण जनतेशी संपर्क साधण्याच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमास मिळणार्‍या प्रतिसादाने नागरीकांचे लक्ष वेधले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !