जळगावच्या समता नगरात धाडसी घरफोडी : 81 हजारांचा ऐवज लंपास


Daring burglary in Jalgaon’s Samata Nagar : 81 thousand instead of loot जळगाव  जळगाव शहरातील समता नगर परीसरातील राजू किराणा दुकाना समोरील बंद घर फोडून घरातील चांदीच्या वस्तूसह रोकड मिळून एकूण 81 हजारांचा ऐवज लांबवला. हा प्रकार शनिवार, 6 जानेवारी रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडला. रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाढत्या चोर्‍या-घरफोड्यांनी नागरीक धास्तावले आहेत.

बंद घरे चोरट्यांना पर्वणी
प्रतिभा चंद्रकांत बनसोडे (40, रा.राजू किराणा दुकानासमोर, समता नगर, जळगाव) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवार, 6 जानेवारी रोजी कामानिमित्ताने त्या बाहेर गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. सकाळी 8.30 ते दुपारी 2.30 वाजेच्या दरम्यान घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत कपाटातील 71 हजारांची रोकड व 10 हजारांच्या चांदीच्या पाटल्या असा एकूण 81 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवण्यात आला. शनिवारी दुपारी अडीच वाजता प्रतिभा बनसोडे या घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला.



त्यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर सायंकाळी सात वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय सपकाळे हे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !