जळगावातील कुविख्यात गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार
Notorious criminals from Jalgaon exiled for two years जळगाव : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्या जळगावातील सुप्रीम कॉलनी परीसरातील गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले. उपविभागीय अधिकारी महेश सुधाळकर यांनी याबाबतचे आदेश शनिवार, 6 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता काढले. आकाश भास्कर विश्वे (34, रा. भगवा चौक, सुप्रीम कॉलनी) असे हद्दपार गुन्हेगाराचे नाव असून दुसर्यांदा त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
कुविख्यात गुन्हेगाराची जळगावात दहशत
रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या आकाश विश्वे याची सुप्रीम कॉलनी परिसरात प्रचंड दहशत आहे. त्याच्यावर 2014 पासून खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत, दुखापत करणे व इतर वेगवेगळे आठ गुन्हे दाखल आहे. त्याची दहशत पाहता त्याला 2016 मध्ये एक वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले होते. तरीदेखील त्याने दहशत निर्माण करत गुन्हे करणे सुरूच ठेवले. या गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून एमआयडीसी पोलिस ठाण्याकडून त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यास उपविभागीय अधिकारी महेश सुधाळकर यांनी मंजुरी देत दोन वर्षांसाठी हद्दपार केले.


संशयिताला छत्रपती संभाजी नगरात सोडले
हद्दपारीच्या प्रस्तावाची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हवालदार गणेश शिरसाळे, निलोफर सैयद, पोलिस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, साईनाथ मुंढे, नरेंद्र मोरे यांनी केली. हद्दपार कालावधीत विश्वे याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोडण्यात आले आहे
