शेजार्याचा त्रास अन् बकरीसह मालक पोलिस ठाण्यात
यावलमधील प्रकाराने पोलिसांना आश्चर्याचा धक्का
यावल : शेजारी बकरीच्या अंगावर सातत्याने गरम पाणी टाकतो मात्र मुके जनावर बोलणार कसे ? म्हणून बकरीच्या वतीने मीच तक्रारदार म्हणून आल्याचे सांगत एकाने चक्क बकरीसह यावल पोलिस ठाणे गाठले हा प्रकार पाहून यावल पोलिसांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला. यावलमधील खाटीक वाड्यातील रहिवासी जुबेर दस्तगीर खाटीक हे बुधवारी दुपारी दीड वाजता बकरी घेऊन थेट पोलिस ठाण्यात आले व त्यांनी आपल्या बकरीला न्याय देण्याची मागणी केली तर या घटनेनंतर पोलिसांना खरे तर मोठा धक्काच बसला मात्र त्यांनी तक्रारदाराची समजूत काढत संबंधित महिलेविरुद्ध तक्रार देण्यास सांगितल्यानंतर तक्रारदार बकरी घेऊन घरी परतला मात्र थेट बकरीलाच पोलिस ठाण्यात आणल्याची चर्चा संबंध तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

