जळगावातील 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार : नराधमाला अटक
Abuse of 12-year-old minor girl in Jalgaon: Murderer arrested जळगाव : भीक मागून उदरनिर्वाह करणार्या अल्पवयीन 12 वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोरआली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल होताच त्यास अटक करण्यात आली. संशयिताला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. वसीम खान कय्युब खान (25, रा.पटेलवाडा, ममुराबाद, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
शेतात नेत पीडीतेवर अत्याचार
जळगाव शहरातील एका भागात 12 वर्षीय पीडीता परीवारासह वास्तव्याला आहे. चिमुकली ही गतीमंद असून ती आत्यासोबत भीक मागून उदरनिर्वाह करते. शुक्रवार, 5 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पीडीता सुभाष चौक परिसरात भिक मागत असतांना संशयित आरोपी वसीम खान कय्युब खान (25, पटेलवाडा, ममुराबाद, जळगाव) याने पीडीतेला दुचाकी (एम.एच.19 ई.एच.5431) वर बसवून जळगाव-भुसावळ महामार्गावरील दुरदर्शन टॉवरजवळील एका शेतात नेत व तिथे तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर परत दुचाकीवर बसवून पीडीतेला सुभाष चौकात सोडून दिले. हा प्रकार घडल्यानंतर पीडीतेने आत्या आणि नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने शनीपेठ पोलिसात तक्रार नोंदवली.


आरोपीला तीन दिवसांची कोठडी
शुक्रवार, 5 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता संशयित आरोपी वसीम खान अय्युब खान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयित आरोपीला रविवार, 7 जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजता त्याच्या घरातून अटक करण्यात आली. संशयिताला न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत करीत आहेत.
