यावल अभयारण्यात ट्रॅप कॅमेर्यात पट्टेदार वाघाची छबी कैद
Trap camera captured image of striped tiger in Yaval sanctuary यावल : यावल अभयारण्य आणि प्रादेशिकच्या सीमेवर जंगलामध्ये शनिवार, 6 रोजी यावल प्रादेशिक वन विभाग यांनी लावलेल्या लावलेल्या उच्च क्षमतेच्या ट्रॅप कॅमेर्यात पट्टेदार वाघाची छबी कैद झाली आहे. 175.58 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या यावल अभयारण्याची वन आणि वन्यजीव संपदा कधीकाळी जगभरात दखलपात्र होती.
मेळघाट ते अनेर डॅम या नैसर्गिक टायगर कॉरीडॉर असल्याने कोरोना काळातही यावल अभयारण्यामध्ये 2021 मध्ये वाघ आढळून आला आहे. वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेर्यामध्ये असलेला वाघ हा नर आहे कि मादी आणि याचे साधारण वय किती असू शकते याची माहिती लवकरच उपलब्ध होईल, अशी माहिती यावल उप वनसंरक्षक जमीर शेख यांनी दिली आहे.


