धुळ्यात धूम स्टाईल मोबाईल चोरी : आरोपी जाळ्यात
धुळे : धूम स्टाईल मोबाईल चोरी केल्याप्रकरणी रीतीक उर्फ संधू अमरसिंग गोटे (19, रा.गुरूद्वाराचे मागे, उचाळे वस्ती, गुरूतेग बहाद्दर कॉलनी, धुळे) यास धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पांझरा चौपाटीवर पाठलाग करून ताब्यात घेतले. आरोपीने चोरीची कबुली देत चोरीतील मोबाईल काढून दिला असून गुन्ह्यात वापरलेली बुलेटही जप्त करण्यात आली. आरोपीकडून आणखी काही चोर्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक, डॉ.राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, उपनिरीक्षक हनुमान उगले, हवालदार रफीक पठाण, संजय पाटील, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, राहुल सानप, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रवीकिरण राठोड, मयुर पाटील, अशोक पाटील, तुषार पारधी व किशोर पाटील आदींच्या पथकाने केली.

