भरधाव कंटेनरने चिरडल्याने बसमधील 11 प्रवाशांचा मृत्यू


दोंडाईचा-निमगुळ रस्त्यावर भीषण अपघात ; 25 प्रवासी जखमी

दोंडाईचा : दोंडाईचा-निमगुळ रस्त्यावर भरधाव डंपरने बसला दिलेल्या धडकेत बस चालकासह 11 प्रवाशांचा मृत्यू झाला तर तब्बल 25 प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास निमगुळ गावाजवळ घडली. डंपरने दिलेल्या जोरदार धडकेत बसचा अक्षरशः अर्धा बाजूचा भाग कापला गेला. मध्यरात्री उशिरापयर्र्ंत निमगुळ ग्रामस्थांनी जखमींना उपचारार्थ हलवण्यासाठी धडपड केली. अपघातातील जखमींवर निमगुळ उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील सहा प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

मयतांची ओळख पटवण्याचे काम सुरू
औरंगाबाद-शहादा बस (एम.एच. 20 बी.एल. 3756) ही शहाद्याकडे निघाली असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने बसला चालक बाजूने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की बसची एक बाजू पूर्णपणे कापली गेल्याने शहादा आगाराचे चालक मुकेश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दहा प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून त्यातील सहा प्रवाशांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल घटनास्थळी दाखल होत माहिती जाणून घेतली तसेच मदतकार्याच्या सूचना दिल्या. बसमधील प्रवाशांच्या नातेवाइकांनी घटनास्थळासह शहादा बसस्थानकात धाव घेत मध्यरात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी केली होती.


कॉपी करू नका.