यावलकरांना लवकरच मिळणार शुद्ध पाणी


जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामासाठी 65 लक्ष रुपये मंजूर

यावल : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामासाठी 65 लक्ष रुपये मंजूर झाले असून नुकतीच जिल्हाधिकारी जळगाव डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी प्रशासकीय मंजुरी दिली असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याने शहरवासीयांना शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे.

लवकरच यावलकरांना मिळणार शुद्ध पाणी
यावल नगरपरीषदेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून यावल शहराला पाणीपुरवठा करणार्‍या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरूस्तीसाठी सभेत ठराव करून तो जिल्हाधिकार्‍यांकडे प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी सन 1994 मध्ये करण्यात आली होती तेव्हापासून तर आतापर्यंत जलशुद्धीकरण केंद्रात नव्याने दुरूस्ती करण्यात आली नव्हती परीणामी पुरेशा प्रमाणात शुद्ध पाणीपुरवठा करण्यात नगरपालिकेला अडचण निर्माण होत होती त्या अनुषंगाने वैशिष्टपूर्ण योजनेतून 65 लक्ष रुपये खर्च करून जल शुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती होणार असल्याने आता मात्र शहराला शुद्ध पाणीपुरवठा होण्याची आशा आहे. या केंद्रावर नुकतेच प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांच्यासह माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, धीरज महाजन, गणेश महाजन, राजू फालक आदींनी भेट देऊन पाहणी केली. लवकरच या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात येऊन कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांनी दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !