कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे 75 विद्यार्थ्यांना मिळाली नोकरी
भुसावळातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात धूत कंपनीने घेतल्या होत्या मुलाखती
भुसावळ : हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात धूत ट्रान्समिशन, औरंगाबाद या नामांकित कंपनीने कॅम्पस मुलाखती घेतल्या होत्या. त्यात इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकॉम इंजिनिअरींग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग, मेकॅनिकल इंजिनिअरींग शाखेतून 100 विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. विद्यार्थ्यांची गुणवत्ता व कौशल्य हे लक्षात घेऊन 75 विद्यार्थ्यांची कंपनीकडून निवड करण्यात आल्याचे कंपनीचे एच.आर.मॅनेजर मयूर कोल्हे व रीषभ चौधरी यांनी सांगितले.
कौशल्य प्राप्त विद्यार्थी देशाच्या कानाकोपर्यात -प्रा.पॉल
मागील दशकात नामांकीत कंपन्याचा कल मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी देत असत मात्र गेल्या पाच वर्षांपासून यातील बर्याचशा संपूर्ण भारतातील कंपन्या महाराष्ट्रातील भुसावळ सारख्या शहरातूनसुद्धा कौशल्य प्राप्त विद्यार्थ्यांना संधी देत आहेत. यापूर्वी कंपन्या सर्व विद्यार्थ्यांना सामान पगार देत असत मात्र आता विद्यार्थ्यांच्या दर्जाप्रमाणे 2-3 वेगवेगळ्या प्रोफाइल व टेक्नॉलॉजीसाठी विविध पगार देतात, महाविद्यालयात दुसर्या वर्षाला असतानाच विद्यार्थ्यांची विविध चाचण्या, सॉफ्ट स्किल विकासावर भर दिला जातोय, असे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल प्रमुख प्रा.आय.डी. पॉल यांनी सांगितले.
कौशल्यावर लक्ष केंद्रित केले -निकिता बोरोले
औद्योगिक क्षेत्रात इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध आहे म्हणून मी तांत्रिक ज्ञान, संभाषण कौशल्य, सॉफ्ट स्किल, मुख्य विषयाबाबतचे सखोल ज्ञान, प्रात्यक्षिक ज्ञान व व्यवहारिक दृष्टिकोन या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित केले होते, म्हणूनच निवड झाल्याने आनंद होतो आहे, अशी प्रतिक्रिया इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम इंजिनीअरिंग विभागाची विद्यार्थीनी निकिता बोरोले हिने दिली.
ट्रेनिंग नंतर 2.5 लाखाचे पॅकेज
निवड झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकॉम इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग नंतर 2.5 लाख रुपयांचे पॅकेज मिळणार आहे. हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव मधुलता शर्मा, कोषाध्यक्ष एम.डी.तिवारी, कार्याध्यक्ष एस. आर. गोडयाले, सर्व हिंदी सेवा मंडळ पदाधिकारी, प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे, विभाग प्रमुख डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा.अविनाश पाटील, प्रा. अजित चौधरी, डॉ.पंकज भंगाळे, प्रा.सुधीर ओझा, प्रा. दिनेश पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल प्रमुख प्रा.आय.डी. पॉल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलतर्फे प्रा.आय.डी. पॉल, प्रा.राममोहन अग्रवाल, प्रा.गौरव टेंभूर्णीकर, प्रा.युवराज परदेशी, प्रा.दीपक खडसे यांनी मुलाखतीसाठी परीश्रम घेतले.

