बलात्कारानंतर पीडीतेची आत्महत्या : तिघांविरुद्ध गुन्हा
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील साखरा येथे विवाहितेने बलात्कारानंतर आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून चिठ्ठी जप्त केली असून गरोदरपणातही आरोपींनी आपल्यावर बलात्कार केला व त्याचा व्हिडिओ तयार करून आरोपी आपली बदनामी करीत असल्याने या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद आहे.
तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा
याप्रकरणी आधी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती तर मृत्यूपूर्व चिठ्ठीवरून आरोपी चंद्रभान गणपत कायंदे, परमेश्वर नारायण वावरे, सुरेश नामदेव कायंदे अशी आरोपीची नावं आहेत. तिन्ही आरोपींविरोधात कलम 376 (2)(एच), कलम 376 (डी), कलम 306, कलम 506, कलम 452, कलम 34 आणि सह कलम 66 (ई) आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मयत महिलेच्या पतीने फिर्याद दिली आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत.

