बनावट दारूसह आरोपी जाळ्यात : दुचाकीही जप्त


यावल : तालुक्यातील वढोदा शिवारात वढोदा ते विरावली मार्गावर बनावट देशी दारूच्या मद्याकार्ची विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना मिळाल्याने बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सापळा रचून संशयित रवींद्र सोनवणे (रा. वढोदा) यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून 35 लीटर मद्यार्क आणि 38 हजार 612 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. देशी दारूचे तयार मद्यार्क व दुचाकी (क्र.एम.एच.19 बी.आर.9024) ताब्यात घेतली. संशयीत सोनवणे यास यावल न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !