रांगोळीसह निबंध, चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद


भुसावळ मराठा समाज शहर व तालुकातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजन

भुसावळ : भुसावळ शहर मराठा समाज व तालुकातर्फे रांगोळीसह निबंध आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना भुसावळ परीसरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. शनिवारी स्पर्धेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी निबंध आणि चित्रकला स्पर्धेत भाग घेतला. निबंध आणि चित्रकले स्पर्धेसाठी पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी असे दोन गट करण्यात आले. भुसावळ शहरातील सर्व शाळेमधुन निबंध स्पर्धेसाठी 870 तर चित्रकला स्पर्धेसाठी 473 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. रांगोळी स्पर्धेचे आयोजन म्युन्सीपल हायस्कूलमध्ये करण्यात आले. त्यात खुल्या गटामध्ये 38 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

19 विजेत्यांना बक्षीस वितरण
शनिवारी झालेल्या निबंध, चित्रकल आणि रांगोळी स्पर्धेचे निकाल आणि बक्षीस वितरण बुधवार, 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज शोभायात्रा समारोप ठिकाणी संत गाडगेबाबा हायस्कूल याठिकाणी होणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी मराठा समाज तालुकाध्यक्ष किरण पाटील, अ‍ॅड.तुषार पाटील, छावा तालुकाध्यक्ष कृष्णा शिंदे, छावा जिल्हा संपर्क प्रमुख ईश्वर पवार, अलका भगत, नीलिमा जाधव, सहसचिव योगेश जाधव, युवा उपाध्यक्ष हर्षल रंधे, रुपेश पाटील, विजय कापुरे, वैभव गुंजाळ, योगेश मराठे, राहुल पाटील, सचिन पाटील, पवन कलापुरे, धनंजय चव्हाण, गणेश बावडेकर आदी मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !