भुसावळात संविधान बचाव समितीतर्फे ‘घंटानाद’


भुसावळ : एनपीआर, एनआरसी व सीएए कायद्याविरोधात भुसावळातील संविधान बचावो समितीतर्फे तहसील कार्यालयाबाहेर 26 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. शुक्रवारी 26 व्या दिवशी पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली तर काळा कायद्याला विरोध करण्यासाठी घंटानाद करून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर जो भ्याड हल्ला करून सैनिकांचा जीव घेतल्याने या हल्यातील शहीद जवानांबाबत साबीर शेख यांनी विचार मांडलेत. भ्याड हल्यास एक वर्ष होत असल्याने त्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी श्रद्धांजली अर्पण झाल्यावर या भ्याड हल्ल्याची चौकशी करून संशयीतांना फाशीवर चढवण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संविधान समितीचे सदस्य तसेच यावल तालुक्यातील अनेक जणांनी साखळी उपोषणाला भेट देत पाठिंबा दर्शविला.

यांची होती उपस्थिती
शनिवारी संविधान बचाव समितीतर्फे साखळी उपोषणाच्या ठिकाणी घंटानाद करण्यात आले. प्रसंगी मोठ्या प्रमाणावर संविधान समितीचे सदस्य व पदाधिकारी तसेच सलीम चुडीवाले, साबीर शेख, इमरान खान, निसार झुला, अशरफ कुरेशी आदी उपस्थित होते. दुपारी 12 ते 2 या वेळात साखळी उपोषणाच्या ठिकाणी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !