शिक्षकांच्या समस्या सोडवणार -रवींद्र पाटील


भुसावळ : जिल्हा परीषद प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी बांधील असल्याचे प्रतिपादन जिल्हा परीषद शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांनी केले. भुसावळ तालुका प्राथमिक शिक्षक परीषदेतर्फे आयोजित त्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षकांच्या विविध समस्यांविषयी तालुकाध्यक्ष गणेश फेगडे यांनी सभापतींशी चर्चा केली. यावेळी संघटनेचे किशोर माळी, मुसा तडवी, नामदेव महाजन, गोपाळ चौधरी, संदीप पाटील, रमेशसिंग पाटील, रिझवान खान, संजय पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !