कटनीसह देवळाली व पॅसेंजर व खान्देश एक्स्प्रेस आज रद्द


भुसावळ : इटारसी – जबलपूर दरम्यान असलेल्या सोनंतलाई व बागरटावा येथे रेल्वेलाईनीचे दुहेरीकरणाचे काम आणि इंटरलॉकींगचे काम होत असल्याने रविवार व सोमवारी डाऊन (51187) भुसावळ – कटनी पॅसेजर गाडी रद्द करण्यात आली आहे. तर कटनी भुसावळ पॅसेजर ही गाही सुध्दा रविवारी रद्द केली होती. तसेच सोमवारी देवळाली शटल, सूरत पॅसेजर, भुसावळ बाद्रा खान्देश एक्स्प्रेस या गाड्याही भादली – जळगाव दरम्यानच्या ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भादली ते जळगाव दरम्यान असलेल्या तिसर्‍या लाईनीसाठी स्टील गर्डर मंगळवारी टाकले जात असल्याने रेल्वे प्रशासनाकडून सकाळी 9.10 ते दुपारी 1.10 असा चार तासाचा मेगा ब्लॉक मंगळवारी घेतला आहे. यामुळे भुसावळहून सुटणार्‍या देवळाली शटल, सूरत पॅसेजर, भुसावळ बाद्रा खान्देश एक्स्प्रेस या गाड्या सोमवारी रद्द केल्या आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात इंजिनिअरींग विभागाकडून तिसर्‍या रेल्वे लाईनीचे कामासाठी स्टील गर्डर मंगळवारी (दि. 18) भादली ते जळगाव दरम्यान टाकले जाणार आहे, त्यासाठी चार तासांचा ब्लॉक घेतला आहे. यामुळे अप-डाऊन मार्गावरील दोन्ही बाजूच्या बारा गाड्या यामुळे प्रभावीत होणार आहे. विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर या गाड्या थांबवणार आहे. खान्देश एक्स्प्रेससह सहा पॅसेजर गाड्या रद्द केल्या आहे.

सोमवारी रद्द केलेल्या पॅसेजर गाड्या
अप भुसावळ देवळाली शटल (51182), डाऊन सूरत-भुसावळ (59077), डाऊन सूरत -भुसावळ (59013) आणि डाऊन (19003) बांद्रा टर्मिनस-भुसावळ खान्देश एक्स्प्रेस या गाड्या सोमवारी रद्द केल्या आहे. खान्देश एक्स्प्रसे ही गाडी बांद्रा येथून रद्द करण्यात आली आहे. तर मंगळवारी (दि. 18) डाऊन (51183) डाऊन देवळाली -भुसावळ शटल, अप (59076) भुसावळ – सूरत पॅसेजर, अप (59014) भुसावळ- सूरत पॅसेजर यासह अप (19004) भुसावळ -ब्रांद्रा टर्मिनस खान्देश एक्स्प्रेस ही गाडी सुध्दा मंगळवारी रद्द करण्यात आली आहे. सहा पॅसेजर आणि दोन खान्देश एक्स्प्रेस तसेच सोमवारी सकाळी सुटणारी भुसावळ कटनी पॅसेजर सुध्दा रद्द केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !