माजी नगरसेवक परीक्षीत बर्हाटेंना जीवे मारण्याची धमकी
भुसावळ : माजी नगरसेवक परीक्षीत बर्हाटेंना जीवे मारण्याची धमकीमाजी नगरसेवक परीक्षीत बर्हाटे यांच्या मोबाईलवर जळगाव येथून एका व्यक्तीने शिवीगाळ करून त्यांना 30 दिवसात जीवे मारण्याची धमकी मेसेसद्वारे दिली आहे. बर्हाटे यांनी या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यता आला. क्षत बर्हाटे यांनी सांगितले की, मी दोन दिवसांपूर्वी दिल्ली येथे असतांना माझ्या मोबाईलवर मला शिवीगाळ करणारा आणि 30 दिवसाच्या आत जिवे ठार मारण्याची धमकी देणारा मेसेज आला. बर्हाटे हे दिल्ली येथून शनिवारी आल्यावर त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठत पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना भेटत त्यांना आलेला मेसेज दाखवला. याप्रकरणी बर्हाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित व्यक्ती विरूध्द तक्रार दाखल करण्यात आला. बर्हाटे यांनी याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांची भेट घेऊन त्यांच्याही कानावर हा प्रकार टाकला आहे. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांचीही या प्रकरणी जिल्हाध्यक्ष जावळे हे भेट घेणार आहे, असे बर्हाटे यांनी सांगितले.
