नोकरी व पदोन्नतीबाबत शासनाच्या भूमिकेविरुद्ध निदर्शने


भुसावळ शहर काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने प्रशासनाला निवेदन

भुसावळ : भुसावळ शहर काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने, भाजप सरकारने सर्वोच्य न्यायालयात अनु.जाती व जमातीच्या शासकीय नोकरी व पदोन्नतीच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात निदर्शने करण्यात आली तसेच प्रांताधिकारी प्रशासनाला प्रसंगी निवेदनही देण्यात आले. प्रसंगी उत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे समन्वयक योगेंद्र भैय्या पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु.जाती विभागाचे समन्वयक भगवान मेढे, जळगाव जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस रहिम कुरेशी, जळगाव जिल्हा काँगे्रस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, भुसावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पंकज पाटील, उपाध्यक्ष विजयजी तुरकेले, ईस्माइल गवळी, गफुरभाई गवळी, सुनील जोहरे, विनोद पवार, सुजाता सपकाळे, नंदा सावळे, अनिता सपकाळे, निलेश थोरात आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !