देशात नरेंद्र तर महाराष्ट्रात पुन्हा येणार देवेंद्र

नगराध्यक्ष सुनील काळे यांचा विश्वास ; वरणगावात भाजपाची सदस्य नोंदणी
वरणगाव : भाजपाच्या सदस्य नोंदणीला नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. अभियानात भाजपा शहरप्रमुख सुनील माळी, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, माजी सभापती राजेंद्र गुरचळ, कामगार नेते मिलिंद मेढे, भुसावळ भाजपा नेते लक्ष्मण सोयंके, युवा नेते अजय पाटील, संजयकुमार जैन, भाजपा नेते मनोहर सराफ, हाजी अल्लाउद्दीन सेठ, प्रदीप भंगाळे, अॅड.दिलीप बोदवडे, शामराव धनगर, माजी सरपंच साजीद कुरेशी, सुखलाल धनगर, ज्ञानेश्वर घतोळे, प्रशांत मोरे, आकाश निमकर, हितेश चौधरी, बंटी सोनार, किशोर सोना, कमलाकर मराठे आदी उपस्थित होते.
पुन्हा फडणवीस सरकार -नगराध्यक्ष
केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आले त्याप्रमाणे राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस सरकार येणार असून भाजपाच्या सदस्य नोंदणीला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले. वरणगाव शहरात पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शसनाखाली विकासाचा झंजावत सुरू असून वरणगाव शहर हे पालकमंत्री यांचा बालेकील्ला होत असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले. वरणगाव शहरात पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना सोबत घेवून बुथ रचना करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
