दहावी-अकरावीतील विद्यार्थिनींवर पी.टी.शिक्षकाकडून अत्याचार


10th-11th girl students abused by PT teacher फलटण : पी.टी.शिक्षकाने दहावी व अकरावतील विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटनेने फलटण तालुक्यात खळबळ उडाली. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात संबंधित पिटी शिक्षकावर पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन मुलींवर केला अत्याचार
पोलिसांच्या माहितीनुसार, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल झाला होता. या तक्रार अर्जाची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. फलटण तालुक्यातील एका शाळेत एक शिक्षक पिटी शिक्षक म्हणून काम करत आहे. त्या शिक्षकाने दहावीत शिकणार्‍या 16 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. त्याचबरोबर इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षीय मुलीवरही त्याने अत्याचार केल्याचे समोर आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !